जिल्हा

ठाणे महापालिकेचे १२ हजार कोटी खाण माफियांच्या घशात

ठाणे महापालिकेचे १२ हजार कोटी खाण माफियांच्या घशात
ठाणे महापालिकेचे १२ हजार कोटी खाण माफियांच्या घशात फोटो: ठाणे वैभव

मनोज प्रधान यांच्या आरोपामुळे खळबळ

ठाणे : डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यासाठी ठाणे महापालिकेला भिवंडी तालुक्यातील आतकोली गावात ८३ एकरचा भूखंड देण्यात आला आहे. मात्र, या भूखंडावर दगडखाणी तयार करून कोट्यवधींचा महसूल दगड माफियांनी बुडविला आहे. ठामपाच्या घनकचरा विभागाने या दगडचोरीला का अभय दिले आहे? या दगडचोरीत ठामपाचे अधिकारी सहभागी आहेत का? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित केले आहेत.

भिवंडीतील आतकोली येथील ३४ हेक्टर क्षेत्र राज्य शासनाने ठाणे महापालिकेस प्रदान केले आहे. या भूखंडावर ठाणे महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्व तयारीचे काम सुरू आहे. एकीकडे ठामपाच्या मालकीचे डम्पिंग ग्राऊंड असतानाही दिवा परिसरात कचरा टाकला जात असल्याने आतकोली येथे पाहणी करण्यासाठी मनोज प्रधान गेले होते. त्यावेळी या भागात चक्क दगडखाणी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले.

या ठिकाणी बेकायदेशीरपणे दगडखाणी सुरू करण्यात आल्याची तक्रार ठामपाने 10 जानेवारी 2025 रोजी पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, ही तक्रार दाखल करतानाही ठामपाच्या घनकचरा विभागाने चलाखी केली होती.  वास्तविक पाहता, ही तक्रार जिल्हाप्रशासनाकडे करण्याऐवजी ती पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ठामपा अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर दगडखाण सुरू असताना त्यावेळी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करून ठामपाने कोणाला वाचविले होते, असा सवाल करीत प्रधान म्हणाले की, आतकोली येथील ३४ हेक्टरची ही जागा सन २०२४ मध्ये ठामपाच्या ताब्यात आली आहे. ८४.२ एकरच्या या भूखंडावर आजही दगडखाण सुरू आहे. गेल्या काही महिन्यात अंदाजे ३० फूट खोदकाम केले आहे. याचे गणित बांधल्यास एकरामागे किमान ४.५ कोटी ब्रास दगड चोरण्यात आला असावा, त्याची हजारो कोटींची राॅयल्टी सरकार दरबारी जमाच करण्यात आलेली नाही.

ठामपाने या जागेचा दगडखाणीसाठी रितसर लिलाव केला असता तर ठामपाच्या गंगाजळीत किमान १२ हजार कोटींची भर पडली असती. मात्र, ठामपाच्या घनकचरा विभागाने चोरांच्या हातात चक्क तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत, असेही प्रधान म्हणाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475